देहबुध्दीची बंधनं - मी कित्येको जन्म विविध योनींमधून फिरत होते. मीच "मी-मला-माझे", हवे/नको या अनंत इच्छा-आकांक्षा-हव्यास यात गुंतवून घेतले होते. माणसे-वस्तू यांच्या मोहाने मी फरफटली जात होते. तात्पुरती-ओढ याने मी हो-नाहीच्या द्वंव्दात अडकलेली होते. आशा-निराशा, चिंता, सुख-दुःख यानं मला घेरलं होतं.
|
देहबुध्दीकडून आत्मबुध्दीकडे
२००४, मे महिना, वैशाख शुध्द ३ - अक्षय्यतृतीया...
माझ्या आयुष्यात हा दिवस एक परिवर्तनाची नांदी घेऊन आला.
कणकवलीचे श्री. करंबेळकर गुरुजी (आयुर्वेदाचार्य, ज्योतिषी, थोर रामोपासक, अनेकांना सन्मार्गाला लावणारे व त्यांचे गुरु असलेले संतपुरुष) यांना घेऊन कोल्हापूरचे माझे आतेभाऊ व वहिनी (गोखले) माझ्या घरी आले. माझे सासरे हे गुरुजींचे आजेगुरु.
त्यांनी आमच्या पत्रिका पाहिल्या व माझ्याशी भक्तिमार्गाविषयी बोलले.
|
गुरुकृपेची तळमळ या चित्रात दाखवल्याप्रमाणे माझी स्थिती होती. मी एकाकी एका निर्जन बेटावर आहे. माझ्या हातात भागवत-सनातन धर्माचा झेंडा आहे. चांगल्या अनुभवाची प्रचीती येत होती त्य़ामुळे माझी हिंमत वाढत होती.
|
सत्व-रज-तम गुणांचा अभ्यास माझा मुळचा स्वभाव अभ्यासू व डोळस संशोधकाचा असल्याने आता मी हा मार्ग मुळापासून अभ्यासायला सुरुवात केली. वरवरची पुस्तके व नुसत्या कथा वाचण्यापेक्षा मूळ संस्कृतातले ग्रंथ व त्यावरील अन्वयार्थ सांगणारे भाष्यग्रंथ शोधायला सुरुवात केली.
|
चित्तशुध्दीला सुरुवात आपल्या हृदयातच परमात्म्याची वस्ती असते. जर आपल्या हृदयात प्रसन्नता राहिली तर त्याला वास करावासा वाटतो. मग तो आनंदमय असल्याने आपणही आनंदी होतो. त्याचा सहवास आपल्याला आवडू लागतो. तो आपल्यामध्ये रमू लागतो, आपण त्याच्या स्मरणात रमू लागतो.
|
सत्वगुणाच्या वृध्दीला सुरुवात - या चित्रात सात्विक वस्तूंचा विनियोग करून कसा सात्विक यज्ञ करता येतो व त्यामुळे कशी सात्विक स्पंदने तयार होतात हे दाखवले आहे. सात्विक वृत्तीसाठी केशरी रंगाचा वापर केलेला आहे. हे सर्व परमेश्वरप्रीत्यर्थ करायचे असल्याने ते ब्रह्मार्पणही करायचे असते. त्यामुळे करताना काही चुकलं तर पापपुण्याची बाधा करणार्याला होत नाही.
|
शरणागती - “रामनाम” हा अग्नी आहे. तो साधकाची पापे जाळतो व त्याला निर्मल बनवतो.
सतत नामस्मरण करणे/होणे किती अवघड आहे आणि ते साधण्यासाठी गुरुच्या/परमेश्वराच्या कृपेची गरज असते हे अगदी खरे आहे!
ही कृपा कशी होईल, केव्हा होईल ही तळमळ मला लागून राहिली होती.
|
रामनामाचे कवच - या चित्रामध्ये मध्यभागी प्रसन्नपणे रामनाम घेत असलेली मी आहे.
मी असं वाचलं होतं की जागृत देवतांच्या व संत-सत्पुरुषांच्या पावलांमधून प्रचंड शुभशक्ती वाहत असते. त्यामुळे भक्तगण त्यांच्या चरणांना स्पर्श करतात, त्यांच्या पादुकांची पूजा करतात, त्यांच्या चरणांची धूली मस्तकी लावतात. चरणांचे तीर्थ घेतात.
|
अनुग्रह - मागच्या सर्व इच्छांच्या जोखडातून सुटून आता भगवंताकरीता जगायचं याचा २ वर्ष (२००४ ते २००६) मी चालवलेला सततचा ध्यास, घरातल्या सर्व जणांच्या परिमार्जनाचे केलेले प्रयत्न, श्रीदत्तगुरुंना केलेली प्रार्थना, घरात रामनामसेवा सुरु झाल्या दिवशी आपणहून प्रसाद व कृपेची खूण म्हणून आलेल्या महाराजांच्या प्रतिमेचं नकळत झालेलं पूजन,
|
लौकिक व पारलौकिक परिचय कोणी परिचय विचारला की आपलं नाव सांगायचं, आपला व्यवसाय सांगाय़चा, गावाचं नाव सांगायचं, फारच झालं तर कुटुंबाची माहिती द्यायची ही आपली नेहेमीची सवय.
महाराजांची बेलसरेबाबांनी लिहिलेली व प्रकाशित केलेली निरुपणं वाचणं हे मला रोजच्या जेवण्याइतकच प्यारं आहे. एकदा, मी एका निरुपणात असं वाचलं की, आपण झोपेत असताना जरी कोणी उठवून आपलं नाव विचारलं आणि साधकानं आपली ओळख "आपल्या सद्गुरुंचा अनुग्रहीत" अशी दिली तर तो खरा सद्गुरुशरण भक्त.
|
या चित्रात साधक म्हणून मी जगत असताना आपण दोन स्तरांवर जगत आहोत असे माझ्या ध्यानात आले.
मी एक साधक म्हणून रोज जीवनप्रवास करत असताना
१) वरचा निळ्या रंगातला माझा दृश्य व्यवहार म्हणता येईल.
|
१) डावीकडचे वरचे पहिले चित्र -
ब्राह्ममुहुर्तावर उठणे (सूर्योदयापूर्वी २-३ तास)
देवाचे स्मरण करणे,
रोज शुचिर्भूत होणे,
सद्गुरूंची मानसपूजा करणे,
|
- कोणाचे वाईट चिंतायचे नाही
- कोणाला आपल्या स्वार्थासाठी दुखवायचे नाही
- शक्य तितके अन्नदान करायचे विशेषतः जे आपल्यावर उपकार करून परतफेड करू शकणार नाहीत अशांना, तसेच जे कोणी केव्हाही घरी येईल त्याला, तीर्थयात्रेत तेथील याचकांना. हे सुध्दा महाराजांना आवडतं म्हणून
|
अनुसंधान
- सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "महाराज" सोडून मला दुसरा ध्यासच नसतो.
- प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची सवय लागलीय
- काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच महाराज करीत आहेत असं वाटतं. माझ्यातलं दोषदर्शन होतं - मीपणा, लौकिकाची सूक्ष्म आस लक्षात येते.
- देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम ऐकणं चालू राहतं, मनात मी म्हणतेय की नाही याच्याकडे मी लक्ष देत असते.
|