कुलधर्म-कुलाचार

देव म्हणजे काय?
देव म्हणजे दिव्य देह धारण करणारा देह.
देव हा पुरुषवाचक व देवता-देवी हा स्त्रीवाचक शब्द आहे.
देवता हा शब्द दोन्ही अर्थानीं वापरण्यात येतो.

अवतार म्हणजे काय?

अव + तृ या धातूपासून अवतार हा शब्द तयार झाला आहे.
विशिष्ट हेतूंसाठी देवांनी वैकुंठ, कैलास, स्वर्ग इ. ठिकाणी असलेल्या आपल्या उच्च स्थानांवरून विशिष्ट स्वरूप घेऊन खाली येणे हा अवताराचा अर्थ आहे.

कुळधर्म-कुळाचार

कुल -
हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ वंश-घराणे असा आहे. कुल म्हणजे एकत्र येणे-गोळा करणे.
महाकुले - प्रतिष्ठित व यशस्वी कुले

दिनविशेष

यामध्ये भारतीय पंचांगाप्रमाणे विशेष दिवसाच्या आध्यात्मिक महत्वाविषयी थोडक्यात माहिती दिलेली असेल.

संदर्भग्रंथ -
१) पुस्तक - कुळधर्म-कुलाचार-कुलदैवते
लेखक - श्री गजानन शं खोले
२) दाते पंचांग पोथी
३) संपूर्ण चातुर्मास पोथी
लेखक - श्री. वि. के. फडके
४) चित्पावन दिनदर्शिका
५) निर्णयसिंधू
६) धर्मसिंधू

॥श्रीराम समर्थ॥

संतांनी सांगितलेले कुळधर्माचे महत्व -
---------------------
श्रीतुकाराममहाराज -

  • जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो, त्याला ज्ञान प्राप्त होते.

कुलधर्म केला नाही तर काय घडते याविषयी श्रीमत्‌भगवत्‌गीतेतील पहिल्या अध्यायात अर्जुनाने सविस्तर वर्णन केलेले आहे.

- अधर्म माजतो.
- वर्णसंकर होतो. (भिन्न व्यवसायामध्ये लग्न होतात.)
- श्राध्दपक्ष होत नाहीत.

उपाय कोणाकडून होतात?
---------------
- घराण्यातील समंजस, निःस्वार्थी, संवेदनशील व्यक्तीला अतिशय मानसिक क्लेश होतात.
- तिला/त्याला असे वाटत राहते की जे चाललय ते बरोबर चालले नाही. काहीतरी महत्वाचे करायचे राहतेय, चुकतय.. ती टोचणी

नित्यकर्म - (दैनंदिन पूजाविधी)
नित्य (जे कायम असते ते - भगवंत) + कर्म (त्याच्या प्राप्तीसाठी करायचे साधन)

विविध उपचारांसह देवपूजा

पंचोपचार व षोडशोपचार म्हणजे अनुक्रमे ५ आणि १६ उपचारांनी केलेल्या पूजा.
* आपल्या घरी गृहस्थाने रोज करण्याची पूजा ही पंचोपचार पूजा.
* काही विशेष दिवशी उपाध्यायांच्या देखरेखीखाली करण्याची ती षोडशोपचार पूजा.

पूजासाहित्य
-------------------
दैनंदिन पूजा -
धातूची उपकरणे व कोरडे साहित्य
- कलश/तांब्या
- भांडं/पंचपात्र

कुलोपाध्याय
---------------
कुल - घराणे
उपाध्याय - वैदिक शास्त्रे, पुराणे इ. नुसार यजमानाकडून आवश्यक ती धार्मिक कर्मे करुन घेणारे गुरुजी (भिक्षुक/भट/भट्ट/पुजारी/पुरोहित).

विविध कर्मकांडांविषयी मला आलेले अनुभव -
--------------------
- कर्म, कार्य, कर्मकांडं याविषयी जाणून घेणं, त्यांचा संदर्भ निर्णयसिंधू, धर्मसिंधू यामध्ये पाहणं, आमच्या कुलोपाध्यायांशी बोलणं, स्वतः करताना ते समजून घेऊन श्रध्दापूर्वक करणे, कसा अनुभव येतो ते पाहणं