भगवंत आणि सामान्य माणूस-
(संदर्भ - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकरमहाराज चरित्र)
---------------
देव आहे असे खर्या अर्थाने समजून वागणारे फार थोडे असतात.
प्रत्येक जीवाला भगवंताची गरज असल्याने त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही.
भगवंत कसा आहे? -
(संदर्भ - पुस्तक - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज -चरित्र आणि वाङमय -पान ४५६ ते ४६६)
-------------------
सत्य हे परमात्मस्वरूप असते. सत्य अखंड टिकणारे, शांत, सनातन, समाधानमय असते.
परमात्मा हा सच्चिदानंद – सत् (असणे) + चित् (जाणीव) + आनंद – रूप आहे, तरी त्याचे ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहाता येत नाही.
कैलासाचे वर्णन -
योगेश्वर शंकराचे भवानीसह निवासस्थान
-------------------- श्रीशंकराचे वर्णन -
- जटा धारण करणारा
- मस्तकावर गंगा असणारा
- पिनाक नावाचे धनुष्य हाती असणारा
कालचक्र
---------------
भगवंताच्या अनंत रूपांपैकी काल हे एक रूप आहे. ब्रह्मदेवाचा दिवस - रात्र - दिवस - रात्र, त्यात अनंत ब्रह्मांडांची उत्पत्ती - वृद्धी - विनाश ही चक्र अव्याहत चालू आहे. हे चक्र चालवणारा सर्वव्यापी - सर्वसाक्षी असून आपल्याला दिसत नाही.