याला मृत्यूलोक म्हणतात कारण येथे जीवात्मा देहरुपाने जन्म घेतो, त्या देहाची वृध्दी होते, व त्या देहाचा नाश होतो. त्या नाशाला मृत्यू म्हणतात. तो देह कधीही जिवंत होत नाही.
भोग भोगून संपवणे एवढेच काम या योनीत असते. या मध्ये देहधारणा -आहार-निद्रा-मैथुन-पुनरुत्पादन या व्यतिरिक्त मोक्षासाठी काही करता येत नाही. कोणतेही कर्म पाप-पुण्यामध्ये येत नाही. कारण कर्माचे स्वातंत्र या योनींमध्ये नसते.
पृथ्वीच्या खाली सात विवरे आहेत.
सर्व ऋतूंमध्ये सुख देणारी अशी ती उत्तम विवरे आहेत. हे जणू स्वर्गच आहेत.
येथील लोक अत्यंत आनंदीत होऊन सुखाने विहार करीत असतात.
नरक-कर्म-फळ - (संदर्भ- श्रीदेवी भागवत पुराण, पृष्ठे - ५२० ते ५२४, ६०२ ते ६१०)
नरक – याचे स्थान पृथ्वीच्या दक्षिणेला आहे व याचा स्वामी यमधर्म आहे. हा अष्टदिक्पालांपैकी एक आहे.
यमाचे वर्णन –
पितृराज यम पुरुषाचे जसे कर्म असेल त्या प्रमाणात विचारपूर्वक दंड करीत असतो.
मेरुगिरीच्या वर तीन शिखरे आहेत, तिथे स्वर्गलोक आहे.
ही शिखरे विविध प्रकारच्या वृक्षांनी व वेलींनी युक्त आहेत व हर तर्हेच्या फुलांनी सुशोभित आहेत.
यांच्या मध्ये स्फटिक आणि वैडूर्यमण्यांनी युक्त शिखर आहे.