या जगाची निर्मिती कशी झाली, ती कोणी केली, त्या निर्मात्याचा या मागे कोणता हेतू होता, अशीच अजून ब्रह्मांडे अस्तित्वात आहेत का? तिथे काय आहे? माझा आणि या सर्व सृष्टीचा नेमका संबंध काय आहे?
या प्रलयात पृथ्वीपासून ते महः पर्यंत सर्व तत्वांचा संहार होतो.
सलग भीषण अवर्षण पडल्याने व अग्नीच्या संपर्काने (१२ आदित्यांच्या धगीने) पृथ्वीवरील सर्व जल (गंध हे तन्मात्र) नष्ट होते.
आत्यंतिक प्रलय -
तीन प्रकारच्या दुःखांचे ज्ञान झाल्यावर प्राज्ञ माणसाला ज्ञान व वैराग्य प्राप्त होऊन तो आत्यंतिक लय पावतो.
म्हणून मोक्षप्राप्ती हाच आत्यंतिक लय.
तीन दुःखांवर मात करण्यासाठी भगवत्प्राप्ती हेच औषध आहे.