कलियुगापूर्वी ईश्वरीतत्वाची पूजा - ध्यान, वैदिक मंत्रांनी अर्चना होत असे.
कलियुगातील माणूस अल्पमती, अल्पबुध्दी, अल्पआयुषी असल्याने मूर्तीपूजा आली.
त्यात शेकडो पंथ निर्माण झाले व ते पंथ आचरणार्यांमध्ये आमचाच मार्ग सनातन अशा अविर्भावाने भांडाभांडी - मार्यामारी - खून - वैर सुरू झाले.
गणपति पंचायतन -
------------
गणपति प्रधान देवता असणार्या कुलांना गाणपत्य म्हणतात.
गणपतीविषयी विशेष माहिती गणेशपुराण, मुद्गलपुराण इ. ग्रंथात दिलेली आहे.
श्रीशिवपंचायतन -
-------------------
श्रीशंकराची प्रधान देवता म्हणून पूजा करणार्य़ा कुलांना शैव म्हणतात.
या देवतेविषयी सविस्तर माहिती श्रीशिवलीलामृत, शिवपुराण, स्कंदपुराण इ. ग्रंथात दिलेली आहे.
विष्णूपंचायतन
---------------
श्रीविष्णूची प्रधान देवता म्हणून पूजा करणार्या कुलांना वैष्णव म्हणतात.
या देवतेविषयी सविस्तर माहिती श्रीविष्णूपुराण, पद्मपुराण, भागवतपुराण इ. ग्रंथात दिलेली आहे.
श्रीदत्तपंचायतन
---------------
श्रीदत्तगुरुंची प्रधानदेवता म्हणून पूजा करणार्या कुलांना दत्तसंप्रदायी म्हणतात.
या देवतेविषयी सविस्तर माहिती भागवतपुराणात, श्रीगुरुचरित्रात मिळू शकेल.