महाराजांचे मार्गदर्शन भाग १

महाराजांच्या निरुपणातील प्रमुख विषय
-----------------
संदर्भ - महाराज चरित्र -
--------------
श्री. के. वि बेलसरे यांनी महाराजांनी बोलताना- साधकांना मार्गदर्शन करताना जे विविध विषय हाताळले त्यांचे सुंदर संकलन केलेले आहे. त्यातील सार देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.

अनुसंधान

(संदर्भ -श्रीगोंदवलेकरमहाराज चरित्र - लेखक - श्री. के.वि.बेलसरे)
साधकाने अनुसंधान कसे साधावे
- आपले मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून ठेवावे

सद्गुरुचे महत्व
----------------
संदर्भ - चरित्र - पान - ६४८ ते ६५३
------------------
साधकाच्या साधकपणाची सुरुवात स्वतःमधील सततच्या असमाधानाची जाणीव होण्यातून होते

साधन दोन अंगांचे असते. (एकाच वेळी दोन्ही गोष्टी होतात)

ग्रंथवाचन
-----------------
महाराजांनी सुचविलेले ग्रंथ
[संदर्भ - चरित्र, पान ६३३]
- दहा उपनिषदे
- भगवत्‌गीता
- शिवगीता
- कपिलगीता
- योगवासिष्ठ

साधकाने अभ्यास कसा करावा?
------------------
- अभ्यास विवेक व वैराग्ययुक्त असावा.
विवेक (आत्म [जे जे नित्य-आनंदरूप-अविनाशी आहे ते], अनात्म[जे जे अनित्य विनाशी-सुखदुःखकारक आहे ते] विवेक [या दोन्हीतील फरक समजणे])

साधनांचे प्रकार
------------------
[संदर्भ - चरित्र, पान ६३३]
-----------------
साधने अनंत प्रकारची आहेत -
१) तीर्थयात्रा
२) दानधर्म
३) वेदशास्त्राध्ययन
४) अष्टांगयोग
५) सिध्दि प्रसन्न

महाराजांनी साधकांना दिलेली आश्वासने
------------------------
- भक्ताचे कर्तेपण मेले की त्याची मला काळजी लागते.
- मी तुमचा सांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे, ही भावना ठेवून घ्या. वाटेतील अडचणी येऊन जातील, त्या कळणार सुध्दा नाहीत.

काही निवडक पत्रातील मार्गदर्शनाचे सार

चरित्रामध्ये एकूण १७ पत्रांचा मजकूर दिलेला आहे.
प्रवचनांच्या पुस्तकात एकूण ३६ पत्रांचा समावेश केलेला मला आढळला.

गृहस्थधर्म -
नाम सदा बोलावे, गावे, भावे जनांसि सांगावे ।
हाचि सुबोध गुरुंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥
नामात रंगुनीया, व्यवहारी सर्व भोग सेवावे ।