श्रीरामरायाची आळवणी
--------------
दीन हाका मारी, द्वारी तुझ्या हरि
कधी जाईल हाक, तुझ्या कानांवरी
नको अंत पाहू, जीव घाबरला
किती विनवू तुला
रामा दयाघना, किती आळवू तुला ॥धृ॥
महाराजांची श्रीरामरायाशी असलेली अनन्यता
------------------
१) गर्भावस्थेत असल्यापासून महाराज सतत रामनाम ऐकत होते.
२) अगदी लहानपणापासून त्यांना भजनाची आवड होती.
३) सतत ते स्वतः रामनाम घेत असत. मित्रांना "श्रीराम समर्थ" हा कित्ता ते गिरवाय़ला देत असत. वेळ गप्पा-टप्पा यात घालवीत नसत.
महाराजांनी जपलेले/दिलेले नाम
-------------------
जो मंत्र महाराजांना त्यांच्या सद्गुरुंनी दिला, व त्यांनी लाखोजणांना दिला.
तो त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणून ओळखला जातो