|
Home » सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराज » महाराजांची गुरुपरंपरा » महाराजांचे सद्गुरू श्रीतुकामाई » मी अखेर येहळेगावला पोचले!
भजनीमंडळसमाधीमंदिराच्या सभागृहात स्थानिक रहिवाशांचा हरिपाठ त्या रात्री चालू होता. समन्वयने आपली सेवा दिली ढोलकी वाजवून. मला वाटलं होतं की ९ तासांच्या खडतर प्रवासानं समन्वय दमला असेल. पण त्यानं मंदिरातून येणारा ढोलकीचा आवाज ऐकला आणि तो एकदम म्हणाला "हरिपाठ!" स्वारी लगबगीनं चप्पल काढून मंदिराकडे निघाली. त्यावेळी गावात व मंदिरात दिवे नव्हते. तो प्रथम आमच्याबरोबर कडेच्या पायर्यांवर बसला नंतर हळुहळू भजनीपार्टीकडे सरकू लागला. त्याची भीड चेपली. मग तो ढोलकीवाल्याजवळ उभा राहिला. चालू असलेले भजन संपताच न बोलता त्या ढोलकीवाल्यानं आपली ढोलकी समन्वयला देऊ केली. इतरांनी नवीन भजन चालू केले. समन्वयने ठेका धरला. मंडळी रंगात आली. काही महिला थोडं पुढे झाल्या व समन्वयपुढे उभ्या राहून गवळण म्हणू लागल्या इतरांनी त्यांना साथ केली. समन्वय देहभान हरपून वाजवीत होता. त्याचा चेहरा आगळ्या आनंदानं चमकत होता. मी म्हणलं," माई, केव्हढी कृपा केलीत! आल्याआल्याच आपल्या आशीर्वादाची खूण दिलीत." माझे डोळे भरुन आले होते. माझ्या बरोबरची सज्जन मंडळी ते वाजवणं बघून चाट पडली. समन्वयचं हे वेगळंच रुप. झांजा वाजवणारे भक्त - |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |
