१३ सप्टेंबर

१३ सप्टेंबर

शुध्द भावनेशिवाय सर्व व्यर्थ

भगवंत कोणाला दूर असतो?

  • जो स्वतःपासून दूर आहे.
  • जो बाह्य दृष्टीने स्वतःकडे व भगवंताकडे पहातो.
  • जो भोग व दुःख यात वेळ घालवतो.
  • जो देहबुध्दीत आहे - देह म्हणजेच मी असं जो मानतो.
  • जो मी कर्ता असं मानतो - माझ्यामुळे घडले असे मानतो.

 

भगवंतप्राप्तीसाठी साधकाने काय करावे?

  • जेजे केलं तेते भगवंताला अर्पण करावं.
  • अभिमानही भगवंताला अर्पण करावा.
  • भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा.
  • भगवंताशी बोलावे; त्याचे नाम घ्यावे.
  • कर्ममार्ग सोडू नये.
  • नाम जेवढे घेऊ तेवढा त्याचा अनुभव येतो, हे लक्षात घ्य़ावे.
  • आपला भाव शुध्द होण्यासाठी सत्समागम करावा.
  • परमेश्वरच आपल्या हातून साधन करवून घेतो हे लक्षात ठेवावं.
  • ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली, त्याला आपण कधीही विसरू नये.
  • भगवंतानं आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा.
  • जो अंतरंग पाहतो त्याला भगवंत जवळ आहे.
  • मनुष्यजन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे हे लक्षात ठेवावे.
  • सतत भगवंताचे ध्यान करावे.
  • मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे.
  • याच जन्मात सुविचाराने व सद्‌बुध्दीने भगवंत आपलासा करावा.

 

॥श्रीराम समर्थ॥