वेबसाईटच्या कामात मदत

मी अनुसंधान या वेबसाईट ची नियमित वाचक आहे. जेंव्हा पासून मी ती वेबसाईट पहिली आहे तिच्या प्रेमातच पडलीये मी. महाराजांनी तुमच्याकडून एक उत्तम काम करून घेतलंय, त्याबद्दल अभिनंदन. तेंव्हापासून तुम्हाला लिहीन म्हणतेय पण आज योग आला. तुम्हाला भेटायलाही नक्की आवडेल मला.
मी कालच आपल्या अनुसंधान या वेबसाईट वर मदतीचे आवाहन या सदराखालील मजकूर वाचला त्या संदर्भातच लिहितीये. मला ते लिखाण काम करायला अवडेल.
मी महाराजांची अनुग्रहित नाही परंतु भगवान श्रीधर स्वामी (वरद्पूर कर्नाटक) यांची अनुग्रहित आहे. तुम्ही सज्जन गडावर गेल्या असाल तर तुम्हाला माहित असतीलच. माझे दीर महाराजांचे अनुग्रहित आहेत. त्यामुळे आमच्याकडे दोन्ही उपासना चालतात. शेवटी "एक तत्व नाम" हेच सत्य आहे नाही का?
तुमच्या वरील अटी पैकी मी फक्त एकच अट पूर्ण करू शकत नाही ....
१) मी महाराजांची अनुग्रहित नाही
२) बरहामध्ये टाईप करायची सवय नाही पण मला शिकायला नक्की अवडेल.

आपण मला महाराजांचं काम करायची संधी द्यावी हि नम्र विनंती.
आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत.
श्रीराम समर्थ !
--
|| जान्हवी ||
--------------------------
I'd like to contribute my helping hands by typing as well as writing on this site.

Prasad