१६ सप्टेंबर

१६ सप्टेंबर
भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा.

प्रारब्ध -

  • प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ.
  • हे चांगले किंवा वाईट असू शकते.
  • प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत.
  • सुख मिळणं किंवा दुःख वाटणं हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे.
  • मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणेच म्हणजे प्रारब्धाप्रमाणे कमीजास्त प्रमाणत येतात.
  • आपल्या देहाला होणारे भोग आपल्याच कर्माचे फळ असते.
  • जगातल्या घडामोडी जषा चालतात, तशाचआपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात.
  • आपल्यावर येणार्‍या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात.
  • आपत्ती या पाहुण्यासारख्या असतात - त्या येतात तशा जातात देखील.
  • प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच असते.


साधकाने प्रारब्धाकडॆ कसे पहावे?

  • आपल्या प्रारब्धाने आलेल्या बर्‍यावाईट गोष्टी देहाने भोगाव्या.
  • मनाणे भगवंताचे स्मरण ठेवावे.
  • भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी.
  • जो संताची किंवा सद्गुऊची आज्ञा पाळतो, त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धरूपाने राहात नाही.

खरा भक्त -
हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोघणे या दोन्हींची त्याला फिकीर नसते, म्हणून तो भोग टाळीत नाही. त्याने प्रारब्धावर विजय मिळावलेला असतो.

॥श्रीराम समर्थ॥