२३ सप्टेंबर
शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन
उध्दवाचा श्रीकृष्णाला प्रश्न - आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल?
परमात्म्याचे उत्तर - भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होईल.
भक्तीची ३ साधने
१) शास्त्रवचन
२) थोरवचन
३) आत्मसंशोधन
संतांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले.
कृष्णाचा जन्म उपासनेने आपल्या हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे.
सध्याच्या माणसांचे वर्तन -
- पुराणांवर विश्वास नाही
- आईवडिलांचे महत्व कमी झालेले
- अनावश्यक व निरूपयोगी संशोधन करण्याकडे कल
- मन गढुळलेले
- अभिमान खोल गेलेला
- विचारांवर ताबा नाही
- साधनात आळशीपणा
परिणाम - परमात्म्याचे प्रेम लाभत नाही.
साधकाने यावर काय करावे?
- रामापुढे संपूर्ण शरणागत व्हावे.
- रामाला अगदी विनवणी करून सांगावं की," रामा आता मी तुझा झालो; ह्यापुढे जे काही होईल ती तुझी इच्छा मानून मी राहिन, आणि तुझे नाम घेण्य़ाचा आटोकाट प्रयत्न करीन; तू मला आपला म्हण".
---------------
देव कसा आहे? -
तो अत्यंत दयाळू आहे.
लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही, शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव तयार असतो.
॥श्रीराम समर्थ॥