२४ जानेवारी

२४ जानेवारी

  • केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा, अगदी अल्प प्रमाणात का होईना, पण नित्यनेमाने, ठराविक वेळी, शक्य तर ठराविक स्थळी जर नामसाधन केले तर ते जास्त परिणामकारक होते.
  • धान्य दळायच्या जात्याच्या खुंटाप्रमाणे प्रारब्ध हा खुंटा असून, परमेश्वरात लीन झालेले मन हे जात्याच्या स्थिर पाळ्याप्रमाणे आहे व देह किंवा प्रापंचिक गोष्टी या फिरणार्‍या पाळ्याप्रमाणे आहेत.
  • साधक शेवटपर्यंत कसा पोहोचेल ? -
    • नीतिधर्माचे आचरण करून,
    • शास्त्रशुद्ध वर्तन करून,
    • शुद्ध अंत:करण ठेऊन,
    • भगवंताचे स्मरण करून.
  • परमार्थ करीत असताना मनात वाईट विचार आले तर घाबरून न जाता भगवंताचे नाम घ्यावे म्हणजे त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे.
  • कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती असली की समाधानाची प्राप्ती होते.
  • ‘भगवंता, मी तुझा आहे’, असे रात्रंदिवस म्हणत गेले की, भगवंत प्रकट होईल.
  • भगवंत जितका प्रकट होईल तितके ‘मी’पणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल.

॥श्रीराम समर्थ॥