४ ऑक्टोबर

४ ऑक्टोबर

भगवंताच्या संयोग-वियोगातच खरे सुख-दुःख आहे.

सामान्य माणूस -
- लोकांचे हित करण्यासाठी झटतो.
- तो स्वतःला सुधारून स्वतःचे हित साधत नाही.
- त्याचा अभिमान आड येतो.
- जगात खरे सुख आणि दुःख आहे असं त्याला वाटतं.

सद्गुरूचे महत्व -
- साधकाचा अहंकार जाण्यासाठी त्याला साधन कारायला लागतं - ते साधन सद्गुरू सांगतात.
- त्यांच्या आज्ञेप्रमाणे साधक वागला की त्याचे हित होते.
- त्याला सद्गुरू सांगतात की ब्रह्म शोधायला कुठे जावे लागत नाही, ते आपल्या जवळच असते. ते सद्गुरू साधकाला दाखवतात.
- सद्गुरूने दाखवल्याशिवाय साधकाला तो परमात्मा दिसत नाही.
- गुरू नामस्मरण हे साधन करायला सांगतात. हे साधन दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते. ते करायला कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये.
- साधकाने देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो.
- सद्गुरू साधकाला सांगतात की तुझे सुखही अपुरे आहे आणि दुःखही अपुरे आहे. खरे सुख-दुःख भगवंताच्या संयोग-वियोगामध्येच आहे.
- साधकाची बुध्दी लवचिक असते. त्याच्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो. म्हणून त्याच्या मागे भगवंताचा आधार हवा.
- साधकाने आपण भगवंताचे आहोत, आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते, असे समजून वागावे.
- पोटापुरते भगवंताकडे मागावे, पण जास्त मागू नये.
- भगवंत आपल्या जवळ आहे तसेच तो अत्यंत दूरही आहे. तो सर्वव्यापी आहे. म्हणून तो आपल्याला दिसत नाही.
- भगवंत काल होता, आज आहे, आणि उद्या राहणार आहे.
- भगवंताचा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा त्याचा वाढदिवस साजरा करून त्याचे अस्तित्व साधकाने जागृत ठेवावे.

॥श्रीराम समर्थ॥