५ ऑक्टोबर

५ ऑक्टोबर
अभिमानाची पूर्णाहूती हाच खरा यज्ञ.

भगवंत कसा आहे?
- त्याच्या कडे ज्याप्रमाणे पहावं तसा तो दिसतो. आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो.
- सर्व अवतार भगवंताचेच आहेत.
- ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचीती जास्त.
- भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळा असतात.
- भगवंताला जन्ममरण नाही.
- तो सच्चिदानंद आहे.
- भगवंताचे उत्सव हे त्याचे स्मरण, त्याची जाणीव होण्यासाठी करावेत.
- आपण जोपर्यंत साकारावर प्रेम करतो तोवर भगवंताला आकार घेणे भाग पडते.
- खरे परमात्मस्वरुप संतांनी जाणले. म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणलं.
- परमात्मस्वरूप शांत-आनंदस्वरूप व सत्यस्वरूप असते.

साधकांनी आनंदस्वरूप परमात्मा मिळविण्यासाठी काय करावे?
- आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत गरज आहे हे मान्य करावे.
- भगवंताची प्राप्ती आपल्याला अतिशय हितकारक असते हे लक्षात घ्यावे.
- विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा अभावानेच एकत्र सापडते. त्यामुळे आपली विद्वत्ता आपल्या परमात्मप्राप्तीच्य़ा आड येते का पहावे.
- ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुध्दी आणि तो खरा सद्‌व्यवसाय हे लक्षात घ्यावे व तसे वागावे.
- निर्हेतुक कर्म केल्याने आपल्यामध्ये सात्विकता येते. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहूती द्यावी लागेल. सर्वस्व अर्पिल्याने आपल्याला यज्ञाचे सार कळेल.
- जो स्वतःला ओळखतो तोच भगवंताला ओळखतो.
- विकारांच्या अधीन होऊ नये.
- नीतीला भगवंताचे अधिष्ठान ठेवावे.
- देवाचे नाम घ्यावे, नीतिधर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे, आणि लोकांना मदत करावी - यालाचे परमार्थ म्हणतात. तो साधकाने मनापासून करावा.

॥श्रीराम समर्थ॥