२८ ऑक्टोबर
------------------------
परमेश्वर आपल्या हृदयात आहे.
-----------------------------------
प्रपंच -
स्वार्थाने कर्म करणे.
-----------------
परमार्थ -
निःस्वार्थपणाने कर्म करणे.
परमार्थ करणारा आसक्तीमध्ये नसतो.
आसक्ती निघण्याची पहिली पायरी - उदासीनता (वस्तू मिळाली तरी आणि नाही मिळाली तरी समाधानी रहाणं / हवे नको चा आग्रह जाणं)
-----------------
ज्ञान -
देव आहे असे निःशंकपणे वाटणे.
हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते.
-------------------------
तीर्थक्षेत्र -
क्षेत्राच्या ठिकाणी दगड-मातीच असतात. आपल्या भावनेने आपण क्षेत्राला क्षेत्रत्व देतो.
- जाणे शक्य असल्यास स्वतः जावे
- घरीच क्षेत्र आपल्या दृढ भावनेने निर्माण करावे
- हेही शक्य नसल्यास क्षेत्राचे मनापासून स्मरण करावे
---------------------
तीर्थक्षेत्राचं महत्व का आहे?
- पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होते.
- देव सर्वत्र भरलेला आहे, तो आपण आपल्या भावाने प्रकट करू शकतो हा अनुभव येतो.
- आपल्या पाठीशी भगवंत/सद्गुरू आहेत याचा अनुभव येतो.
-----------------------
कर्तेपण कसे सोडावे?
- गुरुवर श्रध्दा ठेवून त्याच्या आज्ञेत रहावे
- लाभ-हानी देव जाणतो हे लक्षात घ्य़ावे
- जबाबदारी गुरुवर येते हे ध्यानात घ्यावे
- साधन तोच करवीत असल्याने कर्तेपण त्याच्याकडेच येते हे समजावे
- जे जे काही हातून घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते अशी दृढ भावना असावी
- परमात्म्याच्या नजरेखाली, तो पहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव निर्माण करावी
- परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहोत अशी दृढ भावना असावी.
याप्रकारे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते.
--------------------------------------
कर्तेपण सोडल्यामुळे काय होते?
- अभिमान सर्वस्वी जरी गळला नाही तरी आपल्या हातून वाईट कृत्ये घडत नाहीत.
- अभिमान जर पूर्ण गळला तर जे जे आपल्या हातून होते ती त्याचीच सेवा होते
॥श्रीराम समर्थ॥