६ नोव्हेंबर

६ नोव्हेंबर
---------------------
भगवंताची कृपा
-------------------------
भगवंताची कृपा म्हणजे काय?
- भगवंताची कृपा जर नसेल तर बाकी गोष्टी असून नसल्यासारख्याच आहेत.
- कृपा म्हणजे भगवंताशी एकरुपताच
- असेल त्या परिस्थितीत आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.
- भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो.
- भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते.
- त्याची कृपा झाली की किती पाप-पुण्य पूर्वी केले हे पहाण्याची आवश्यक्ता उरत नाही.
------------------------------
भगवंताची कृपा कशी मिळवावी?
- सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे हे लक्षात घ्यावे
- ती मिळवण्याकरीता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे.
- आपण भगवंताशी अनन्यतेने वागावे व त्याच्याकडे त्याचे नाम मागावे.
- भगवंताची आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते.
- भगवंताच्या कृपेबद्दल शंका घेऊ नये.
- काहीही झालं तरी त्याचे नाम सोडू नये.
- पूर्ण कृपेचे लक्षण म्हणजे आपल्या मनात अहेतुक नाम येणे.

॥श्रीराम समर्थ॥