चार देह

आपल्याला चार देह असतात -
१) स्थूल
२) सूक्ष्म
३) कारण
४) महाकारण

-----------------------
चार देहांपैकी स्थूलदेह हा पंचमहाभूतांचा, दृष्य कर्मे करणारा देह.

सूक्ष्मदेह हा विचार, कल्पना, आकांक्षा, अपेक्षा, अनंत वासना साठवलेला मनबुद्धीमय देह.

कारणदेहात पूर्वीच्या सर्व जन्मांत आलेल्या सर्व अनुभवांचे व्यवस्थित संकलन केलेले असते. प्रत्येक कर्म, मनात उमटलेल्या भावभावना इ. सर्व. याला चित्रगुप्तही म्हणतात.

महाकारणदेह हा चैतन्यरूप असतो. हाच परमात्म्याचा अतिसूक्ष्म अंश, अत्यंत तेजस्वी असा.
--------------------------------------------
परमात्म्याने ‘एकोऽहं बहुस्यात्‌।’ असं म्हणून स्वत:ला बहुविध केलं. त्या अगणित अंशांपैकी आपण एक, ज्याला आपण छातीवर हात ठेऊन ‘मी’ म्हणतो, तो हा महाकारण देह, आपली खरी ओळख.

हा अंश मूळ अनादी,अनंत, निराकार, निर्गुण, अज, निर्लेप अशा परमात्म्यामध्ये विलीन होण्यासाठी धडपडत असतो. पण मायेच्या आवरणाखाली सूक्ष्म देहातील वासनांच्या रेट्यामुळे असंख्य देह बदलत, विविध बर्‍यावाईट गतींमधून त्याला नाईलाजास्तव कालक्रमणा करावी लागते. देह हीच आपली ओळख असं जीवात्म्याला वाटत राहिल्यामुळे हा महातेजस्वी अंश झाकला जातो, दुर्लक्षित राहातो - युगानुयुगं.

स्थूल देह-

रंग - लाल
नाम - विश्व
आकार - साडेतीन हात
अवस्था - जागृत
स्थान - नेत्र
ओंकारातील मात्रा - ‘अ’कार
------------------------------
सूक्ष्म देह -
रंग- श्वेत
नाम -तेजस्‌
आकार - अंगठा
अवस्था - स्वप्न
स्थान - कण्ठ
ओंकारातील मात्रा - ‘ऊ’कार
----------------------------------
कारण देह
-
रंग - कृष्ण
नाम -प्राज्ञ
आकार - अनामिकेचे अंतिम पेर
अवस्था - सुषुप्ती (गाढ झोप)
स्थान - हृदय
ओंकारातील मात्रा - ‘म’कार
------------------------------------
महाकारण देह
-
रंग - नील
नाम - तुरीय
आकार - मसुराचा दाणा
अवस्था - तुरीय
स्थान - सहस्रार
ओंकारातील मात्रा - ँ
-----------------------
या महाकारण देहाविषयीचे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये लाहिरी महाशयांच्या पुस्तकामध्ये फ़ार सुंदर आले आहे. फ़ार प्रगत योगी, संतसत्पुरुष, सद्‌गुरु याच तुरीय अवस्थेत स्थित असतात.
मी देह ही ओळख जाऊन मी शिव मां परमात्मा या अनुभूतीचा आस्वाद ते घेत असतात.
--------------------------
माझी देहबुद्धी कधी जाईल? माझ्या देहासंबंधीच्या इच्छा, आकांक्षा कधी सुटातील? मी आत्मा ही जाणीव कशी निर्माण होईल व सातत्याने टिकेल?

महाराज म्हणतात, ‘प्रत्येक श्वासागणिक रामनाम येत राहिलं की’!

॥श्रीराम समर्थ॥