श्रीमारूतिरायाची पूजा -
मारूतिराय़ २ रूपातले -
१) दासमारूति
२) वीरमारूति
-------------------
दासमारुति -

- श्रीराममंदिरात श्रीरामापुढे स्वतंत्र छोट्या मंदिरात
- साधारणपणे काळ्या रंगाचा
- छाती फाडून आतली सीतारामाची आराध्यमूर्ती दर्शविणारा
- श्रीरामरायापुढे हात जोडून उभा
- दृष्टी रामरायाच्या चरणांवर खिळलेली
- शांत, सौम्य, नम्र, विनीत भाव
---------------------------------
पूजाविधी
- दर्शन रोज घ्यावे.
- पायाशी फुले वाहावीत वा गळ्यात हार घालावेत.
- तुळस वहावी (वैष्णव म्हणून)
- खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा
- नारळ वहावा
- कापूर उदबत्ती ओवाळावी
- त्याच्यासारखी रामभक्ती आपल्या अंतःकरणात यावी यासाठी प्रार्थना करावी
- तेल ओतू नये
मारुतिरायाचे दर्शन घेतल्यावर श्रीरामरायाचे दर्शन घ्यावे.
---------------------------------
वीरमारूति

- गावाच्या वेशीपाशी स्वतंत्र स्थान
- शेंदूरलेपन केलेला
- एका हातात गदा व दुसरा हात दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी उगारलेला
- रौद्र रूप
- केशरी कौपीन नेसलेला
- अंगावर अलंकार असलेला
- सोन्याचा मुकुट मस्तकी असलेला
--------------------------------------------
पूजाविधी
- आवडता वार - शनिवार
- तिथी - पौर्णिमा
- महिना चैत्र - नवरात्र (शुध्द ८ ते १५)
- विशेष महत्व - साडेसातीत
- शेदूर भाळी लावावा
- रुईची, फुलांची माळ गळ्यात घालावी
- वड्यांची माळ घालतात.
- बेल (महारूद्र म्हणून) वहावा
- नारळ वहावा
- सर्वांगावर तेल, काळे उडीद वहावे
- ११ तुपाच्या वाती मातीच्या पणतीत प्रज्वलीत करून लावाव्यात
- पेढ्याचा, गुळाचा, खडिसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
------------
स्तोत्र - भीमरूपी (श्रीरामदासस्वामीकृत)
स्तोत्राचे पाठ - रोज ११ याप्रमाणे, ११००....११ लक्ष/कोटी
अभिषेक - तेलाचा, पाण्याचा,
मंत्र - रूद्राध्याय
---------------------
श्रावणातील बटूपूजन -
कोकणामध्ये अजूनही हा कुलाचार करतात. पूर्वी देशावरही करीत असत. सध्या तो क्वचित दिसतो.
श्रावणातील प्रत्येक शनिवारी पूर्वी पाठशाळेत वेद शिकणार्या १२ वर्षांच्या आतील बटूंना सुवासुनी घरी बोलावीत असत. डोक्याला कोमट तेल लावीत असत. उन पाण्याने व उटण्याने स्नान घालीत असत. देह पुसायला पंचा देत असत. बदलायला वस्त्रे देत असत. यजमान त्यांना चंदनाचे गंध लावीत. पाटावर बसवून केळीच्या पानाभोवती रांगोळी काढून गोडाधोडाचे आग्रहाने भोजन वाढीत. आंचवल्यावर हात पुसायला छोटे वस्त्र देत. सुवासिनी त्यांना औक्षण करीत. यजमान दक्षिणा देत.
मी काही वर्षे घरी बटूपूजन केले. सध्या मात्र मी आळंदीतील नृसिंहसरस्वती पाठशाळेतील बटूंसाठी स्नानाचे साहित्य व भोजनाकरीता दक्षिणा पाठवते.
--------------------------------------------------------------------------------
पंचमुखी हनुमान

काही संकट आल्यास या हनुमानाची पूजा करतात.
दक्षिणामुखी घर असल्यास घराच्या बाहेरील दरवाज्याच्या बाहेरच्या चौकटीवर (दक्षिणॆकडे तोंड करून) या हनुमानाची प्रतिमा टांगावी. वास्तुदोष कमी होतो.
रूप पाच मुखे, दहा हात, मुद्रा रुद्र
१) एक मुख वानराचे
२) एक मुख वराहाचे
३) एक मुख सिंहाचे
४) एक मुख घोड्याचे
५) एक मुख गरुडाचे
-------------
पूजा विधी
- बाकी सर्व वीरहनुमानाप्रमाणेच
वार - मंगळवार
पंचमुखी हनुमत्कवचाचे ११२१ पाठ उपाध्यायांकडून करवून घ्यावेत.
--------------------------------------------------
ध्यानमारूति -

हिमालयामध्ये एकांतात हे ध्यानस्थ असतात. त्यांच्याकडून श्रीरामसेवेची प्रेरणा घ्यावी.
॥श्रीराम समर्थ॥