८ नोव्हेंबर
---------------
कर्तव्य करावे, मग व्हायचे ते होऊ द्यावे
---------------------------------
आपण कशाने बनलोय?
१) देह
२) मन
३) हृदयस्थ भगवंत
--------------------------
दुःखाचा स्रोत -
२५% नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित संकटं, दारिद्र्य इ.
देह -
- लहान आहे
- आकुंचित आहे
- तात्पुरता आहे
- सान्त आहे (याला मरण आहे)
- देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे
- तो आपल्या मार्गाने जात असतो
- तो दुःख निर्माण करू शकत नाही
भगवंत
- भगवंत आनंदस्वरूप असल्याने तो दुःख निर्माण करु शकणारच नाही.
मन
७५% दुःख मन निर्माण करते.
- कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभावधर्म
- ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म ते अंगिकारते
- मन जर भगवंताला सोडून देहाला चिकटले तर मन दुःख निर्माण करते
- हे दुःख कसे निर्माण होते?
देह म्हणजेच मी आहे असं वाटायला लागलं की जिकडेतिकडे दोनपण दिसू लागते
त्यातून भयरूपी समंध साकार होतो व तो जीवाला छळतो.
---------------
वस्तुस्थिती काय आहे?
- भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले
- त्यात घडणार्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो
- कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात.
- त्यात भगवंताचा हात असतो.
- भगवंत आपल्याला सांभाळतो ही वस्तुस्थिती आहे.
- भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले.
- भक्त जर भगवंताच्या नामात गुंतून राहिला तर त्याला भगवंताचे सहाय्य मिळते
- अशा भक्ताला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही.
----------------------------------
साधकाने काय करावे?
- भगवंताचा विसर पडू देऊ नये
- अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून रहावे
- प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येणं शक्य आहेत तेवढ्या कराव्यात
- आपल्या मनासारखेच व्हावे असा हट्ट धरू नये
- रामावर निष्ठा ठेवावी
- कर्तव्य करताना अनीती/अधर्म होत नाही ना याकडे लक्ष पुरवावे
- शेवटी जे व्हायचे ते होऊ देत असे म्हणावे
फल -
काळजीची सवय जाऊन सुखी रहाण्याची सवय लागेल
॥श्रीराम समर्थ॥