सध्याचा काल
(संदर्भ - दाते पंचांग)
----------------
- श्रीमहाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या १०० वर्षे आयुष्यापैकी ५० वर्षे होऊन गेली आहेत.
- ५१ वे वर्ष चालू आहे (द्वितीय परार्ध)
- त्यातील पहिला महिना चालू आहे
- पहिल्या महिन्याचा पहिला पंधरवडा (पक्ष) चालू आहे
- या पहिल्या पक्षाचा पहिला दिवस चालू आहे (४००० युगे - एक दिवस - १४ मनू)
- या पहिल्या दिवसाच्या १३ घटिका, ४२ पळे आणि ३ अक्षरे होऊन गेली आहेत.
- सध्या श्वेतवाराह कल्प चालू आहे. (७१ मन्वंतराचा एक कल्प होतो)
१४ मनू
१- स्वायुंभव
२- स्वारोचिष
३- उत्तम
४- तामस
५- रैवत
६- चाक्षुस
७- वैवस्वत - सध्या हे मन्वंतर चालू आहे
८- सावर्णि
९- दक्षसावर्णि
१०- ब्रह्मसावर्णि
११- धर्मसावर्णि
१२- रूद्रसावर्णि
१३- देवसावर्णि
१४- इंद्रसावर्णि
---------------------
वैवस्वत मनू
२७ महायुगे होऊन गेली आहेत (४ युगांचे १ महायुग होते - १२००० दिव्यवर्षे)
-------------
२८ वे महायुग चालू आहे.
या महायुगातील कृतयुग (१७,२८००० वर्षे) होऊन गेले.
त्रेतायुग (१२,९६,००० वर्षे) होऊन गेले.
द्वापरयुग (८,६४००० वर्षे) होऊन गेले.
--------------
सध्या कलियुग चालू आहे.
कलियुगाची एकूण वर्षे - ४,३२,०००
सध्या पहिला चरण चालू आहे (पहिला १/४ = १ लाख ८ हजार वर्षे)
त्यातील ५,११० वर्षे झाली. (१ लाख २ हजार ८९० वर्षे शिल्लक आहेत)
६ शककर्त्यांपैकी
१) इंद्रप्रस्थातील युधिष्ठिराची ३,०४४ वर्षे संपली
२) उज्जयिनीतील विक्रमादित्याची १३५ वर्षे संपली
३) पैठणातील शालिवाहन शक चालू आहे
त्याची एकूण वर्षे १८,००० आहेत.
त्यातील १९३२ वर्षे संपली
१९३३ वे वर्ष चालू आहे.
खरनाम संवत्सर चालू आहे.
(६० संवत्सरांचे चक्र असते) http://www.anusandhan.org/node/568
-------------------------------------------
गेल्या काही दिडशे-दोनशे वर्षांच्या कालावधीत परकीय आक्रमणे भौगोलिक-सांस्कृतिक-शैक्षणिक स्तरांवर झाल्याने आपण खर्या सगुणोपासनेपासून, कुलधर्म-कुलाचारापासून, भगवंताच्या अस्तित्वाविषयीच्या श्रध्देपासून खूप लांब गेलो आहोत.
पैसा-सेक्स-करमणुक याचा चाळा-लळा-ध्यास लागल्याने नको एवढे असमाधानी-अस्वस्थ-दुःखी-बेचैन-विकॄत विचारसरणीचे आपण झालो आहोत. प्रवाहपतित झालो आहोत.
आता खरे संत जन्म घेणे व देहात असून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणे शक्य नसणार आहे इतका कलिकाळ माजला आहे.
त्यानं आपली बुध्दी भ्रष्ट केली आहे.
आपण सगळेच विपरीत विचार करतो आहोत आणि स्वतःला फार शहाणे समजत आहोत.
सध्याच्या कालात नामावतार आहे.
त्याला श्रीविष्णूचा बुध्दावतार म्हणतात.
हा अव्यक्त, सूक्ष्म, मौनी व साक्षी आहे.
मानवदेहात जन्म घेऊन धर्मसंस्थापनेचं, दुर्जनांचं निर्दालन व सज्जनांचं रक्षण करण्याला अनुकूल काल सध्याचा नाहीये.
परमेश्वराचं नुसतं नाम सतत घेतल्यानं सुध्दा मोक्ष मिळणं शक्य आहे हे सर्व संतांनी आपल्याला सांगून ठेवलंय. त्याकरीता त्यांनी समाजाची अवहेलना सहन केली, देहयातना सोसल्या, विषप्रयोग पचवले.
आता असे संत जन्माला येणे अवघड आहे. त्याकरीता आधीच्या २१ पिढ्या भगवत्भक्तीत असाव्या लागतात.
म्हणून संतांना शरण जाऊन ते सांगतील तसे वागायला महाराजांनी सांगितले व शेवटचा श्वास असेतो नामाच्या महिम्याबद्दल ते कळकळीने सांगत राहिले.
॥श्रीराम समर्थ॥
Comments
नवीन संवत्सराचा उल्लेख केला आहे.
मागील वर्षी हे बुकपेज renew केले होते.
यावर्षी नवीन संवत्सराचा उल्लेख राहून गेला होता.
तो आज घातला आहे.
(१९-०७-२०११)
ऋजुता विनोद