२१ नोव्हेंबर

२१ नोव्हेंबर
---------------------
कल्पना थांबून वृत्ती स्थिर झाली पाहिजे
---------------------------------
स्वधर्म व परधर्म
- जोपर्यंत आपली दृष्टी विशाल होत नाही तोपर्यंत ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचे आचरण करणे हिताचे असते.
- मनुष्याच्या अंगी विशालता येत गेली की त्याचे भेदभाव कमी होत जातात.
- त्या मुळाशी तो गेला की त्याला सर्व धर्म सारखेच
-----------------------------------
सर्वसामान्य माणसाची परिस्थिती -
- सुख अमुक गोष्टीने मिळेल अशी तो कल्पना करतो.
- त्याच गोष्टीने दुसर्‍याला कदाचित दुःख होते
- आज जी गोष्ट सुखाची वाटते तीच गोष्त उद्या तशी वाटेल असं नाही
- तो कल्पनेने नाती निर्माण करतो
- तीच नाती तो नाही म्हणायला व विसरायला तयार होतो
- त्याची बुध्दी स्थिर नसल्याने त्याची कल्पनाही स्थिर नसते.
-----------------------------------
साधकाने काय करावे?
- एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी
- पहिली सुखदुःखाची चुकीची कल्पना मारण्यासाठी दुसरी भगवंताची कल्पना करावी.
- भगवंत दाता आहे, त्राता आःए, सुख देणारा आहे अशी कल्पना करावी.
- या कल्पनेचे खरेखोटेपण अनुभवाने येईल
- एकदा भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव आला की कल्पना थांबवावी
- वृत्ती स्थिर झाली की तिला स्थिर वस्तूवर म्हणजे भगवंतावर चिकटवून ठेवावी
-----------------------------------------------
परमार्थाचे सार -
काही नसताना वृत्तीचे समाधान टिकणे व वृत्ती भगवंतापाशी स्थिर होणे.

॥श्रीराम समर्थ॥