२३ नोव्हेंबर
-----------
भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे.
---------------------------
आपली कल्पनाशक्ती व आपली बुध्दी
- ती संकुचित असते
- ती तोटकी असते
- तिला जेवढे समजते तेवढेच ज्ञान असे त्याला वाटते.
- तिच्या मर्यादेपलीकडचे तिला समजत नाही
- जे समजत नाही ते अस्तित्वात नाही असे माणूस समजतो
- त्यामुळे आपल्यात देवांश असूनही आपण तो फुलवीत नाही.
------------------
भगवंत कसा आहे?
- तो आपल्या कल्पनेपलीकडला आहे
- तो आनंदरूप आहे
- तो सर्वगुणसंपन्न आहे
- तो सर्व ठिकाणी भरलेला आहे
- तो कोण्या एकाचा नसून सर्वांचा आहे
- त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते.
- ते जर शुध्द असेल भगवंत आपल्याला जवळ करतो
- ते जर कलुषित/अशुध्द असेल तर तो दूर रहातो.
---------------------
भगवंताला आपल्या जवळ यावेसे वाटावे यासाठी साधकाने काय करावे?
- आपले मागचे घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे
- भगवंताला आपल्या मनात प्रथम स्थान द्यावे.
- भगवंत आपल्या मागे आहे ही जाणीव ठेवावी.
- आपली पुढची जबाबदारी त्याची होऊन जाते
॥श्रीराम समर्थ॥