२७ नोव्हेंबर
------------------
निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे
-----------------------
सर्वसामान्य माणूस
- वृत्ती विषयाकार झाल्यामुळे सगुण व निर्गुण दोन्ही भगवंताच्या रुपांविषयी त्याला गोडी वाटत नाही
- भगवंत आपल्या आधी होता, आत्ता आहे, नंतरही राहणार आहे. तो सतत असल्यामुळे त्याचे अस्तित्व जाणवत नाही. आणि माणूस त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.
- नास्तिक माणुस देवाला देव न म्हणता त्याला निसर्ग, शक्ती, सत्ता असे म्हणतो.
- माणसाला जेवढे ज्ञान असते तितके लिहिता येत नाही; जितके लिहिलेले असते तितके वाचणार्याला समजत नाही; त्याला जितले समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणार्याला, तो जितके सांगतो तितके कळत नाही.
-----------------------
सगुण-निर्गुण
- निर्गुण हे आपले साध्य आहे.
- आपण देवाला स्थलात व कालात आणलेले आहे जे त्याचे सगुण रूपच आहे.
- सगुण खरे धरुन चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोचता येत नाही
- सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की, एकीकडे "मी" नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो, आणि शेवटी परमात्मा उरतो.
----------------------------
साधकाने काय करावे?
- आपण निर्गुणाची ओळख करुन घेऊन सगुणात राहावे.
- मूळ वस्तूचा (परमात्म्याचे) स्वतः अनुभव घ्यावा व त्याला समजून घ्यावे.
- परमात्मा कर्ता आहे असे समजून, आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.
॥श्रीराम समर्थ॥