साधकाने अभ्यास कसा करावा?
------------------
- अभ्यास विवेक व वैराग्ययुक्त असावा.
विवेक (आत्म [जे जे नित्य-आनंदरूप-अविनाशी आहे ते], अनात्म[जे जे अनित्य विनाशी-सुखदुःखकारक आहे ते] विवेक [या दोन्हीतील फरक समजणे])
जे जे आत्मविषयक आहे त्याचा स्वीकार करणे
जे जे अनात्मविषयक (नाशीवंत) आहे ते ते मनाने सोडणे
अधिक वाचनासाठी - ब्रह्मजिज्ञासा - आत्माराम
------------------
वैराग्य (हवे/नको हा हव्यास जाणे, जे जे परमात्मप्राप्तीच्या आड येते त्याचा मनाने त्याग करणे)
वैराग्याची लक्षणे
१) प्रथम इंद्रिये आवरावी
२) इंद्रियांवाचून समाधान मिळणे
३) इंद्रियांकडे मन न गेल्यामुळे चित्ताला सुख वाटणे
------------------------------------
नित्यनेम - नित्याचा नेम करावा. नित्य म्हणजे भगवंत/परमात्मा. तो कसा मिळेल या दिशेने रोज प्रयत्न करणे
------------------------------------
मनोजय
मनोजयालाच समाधियोग म्हणतात
-----------------------------------
वासनाक्षय
४ प्रकारच्या वासना - ज्यांचे जीवाला बंधन होते (हवे/नको यामुळे)
१) देहवासना (देहाला सुख मिळेल अशा वस्तूंची इच्छा होणे)
२) लोकवासना (प्रतिष्ठा/प्रसिध्दी/पत/सन्मान/मान मिळावा ही इच्छा होणे)
३) शास्त्रवासना (शास्त्रे वाचावीत, त्यातील अर्थ समजून घ्यावा, त्यावर मनन करावे इ इच्छा होणे)
४) मुक्तवासना (आपल्याला मुक्ती मिळावी ही इच्छा होणे)
वासनाक्षय म्हणजे वर दिलेल्या चारी वासना नष्ट होणे
॥श्रीराम समर्थ॥