साधकाची दिनचर्या

साधकाची दिनचर्या
----------------
- साधकाने सूर्योदयापूर्वी उठावे
- जाग आल्यावर नाम घ्यावे

- नंतर चूळ भरुन कमीतकमी पाच मिनिटे तरी अंथरुणावर बसून डोळे झांकून भगवंताची प्रार्थना करावी - "भगवंता, तुझ्या कृपेने आजचा दिवस आला. तो तुझ्या स्मरणात जाऊ दे"
- प्रातर्विधि करून पुढे देवाला व वडील माणसांना वंदावे (घरात नसतील तर मनाने वंदन करावे)
- शक्य असेल तर स्नान करावे. नाहीतर प्रपंचाची थोडी कामे करावीत
- स्नान झाल्यावर रोज थोडा वेळ पूजा, जप, ध्यान यामध्ये घालवावा. ज्यांना पहाटे मानसपूजा करणे शक्य नसते त्यांनी ती यावेळी करावी
- नंतर व्यवसायात ७-८ तास जातात
- ते आटोपल्यावर घरी यावे. हातपाय स्वच्छ धुवावे आणि थोडा वेळ जप करावा
रात्री जेवणखाण झाल्यावर नित्यनियमाने ज्ञानेश्वरी/नाथभागवत/दासबोध यापैकी एक ग्रंथ रोज वाचावा. कमीतकमी एक ओवी तरी वाचावी.
- ज्यांना शक्य असेल व सोईचे असेल त्यांनी रोज रात्री थोडे भजन करावे. हे अभंग साधकवृत्तीचे असावेत
(रघुपति राघव राजाराम...., राजाराम राम...., हरे राम हरे राम हरे हरे, सीतारामचरणी लक्ष लागो रे, सद्‌गुरुनाथ माझे आई इ. आळवून तेच तेच म्हणत रहाणे)
- १०-११ च्या सुमारास निजावे. निजण्या अगोदर भगवंताची प्रार्थना करावी की," भगवंता, तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला गेला". जप करीत झोपी जावे.
- उपासकाला एकच खरा नियम आहे की, कोणत्याही काली, कोणत्याही अवस्थेमध्ये, भगवंताचे विस्मरण होता कामा नये, त्याचे नाम चालू असावे.

॥श्रीराम समर्थ॥