३० नोव्हेंबर
----------------------
लोभ्याचे चित्ती धन । तैसे राखावे अनुसंधान ॥
--------------------------
परमेश्वराचे अनुसंधान कसे राखावे?
- मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे, पण भगवंतापासून चित्त दूर करू नये.
- मारुतिरायाचे दर्शन घेत जावे व त्याच्या कृपेने अनुसंधान राखावे
- आपण परमात्म्यापासून (आपल्या मूळ गावापासून) इतके जन्म लांब गेलो होतो, आता मूळ गावी परत जाय़चे आहे हे लक्षात ठेऊन परमात्म्याचे आपण होण्याचा प्रयत्न करावा.
- कशाही पेक्षा जास्त महत्व देऊन भगवंताचे नाम जतन करावे
- कोणाचेही अंतःकरण दुखवू नये (त्याने भगवंत दुखावला जातो)
- व्यवहारातील मान-अपमान गिळून टाकावे
- अखंड रामाचे अनुसंधान राखण्य़ाने सदाचाराकडे वळण लागेल
- माझे खरे नाते फक्त एक रामाशी आहे हा भाव ठेवून रामाला शरण जावे
- स्वतःला रामापायी अर्पण करावे
- कृपेची साक्षात मूर्ती अशा भगवंतापाशी अनन्य (मला तू सोडून दुसरे कोणी नाही हा भाव) व्हावे
- आपले कर्तेपण (मी केलं-करतो-करणार आहे) टाकावे म्हणजे आपल्याला रामाला शरण जाता येईल
- रामाला आपली सर्व चिंता अर्पावी
- मी आता रामाचा झालो, आता त्यालाच माझी काळजी असा भाव चित्ती ठेवावा
- माझे हित तोच जाणे असे मनात आणून स्वस्थ राहावे
- रामाला शरण गेलं की आपल्या विषयवासना सुटण्याला मदत होते.
- एकच रामच माझा धनी आहे हे जाणावे
- अभिमानरहित होऊन रामाला शरण जावे
- जे जे आपण आजवर केले ते ते रामार्पण करावे
- जे जे काही घडते ते रामच करतो हे लक्षात घ्यावे
- जी आपली आताची स्थिती आहे ति रामाने दिली ती चांगलीच आहे हे समजून स्वस्थ राहावे. तो जिकडे नेईल तिकडे जावे
- राम ठेवील त्यात हित मानावे
- सर्व जगत् मिथ्या जे समजण्याचा एकच मार्ग आहे - पर,आत्म्याला शरण जाणे
॥श्रीराम समर्थ॥