१ डिसेंबर
----------------
देहसुखाची अनासक्ती म्हणजे वैराग्य
----------------------------------
सध्याचे जग
- प्रपंचात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत. त्या मिळणे न मिळणे आपल्या हातात नसते.
- सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करीत आहेत
- खूप सुधारणा झाल्या आहेत, त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढले आहे...पण मानव सुखी झाला नाही.
- जो पर्यंत माणुस सुखी होत नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली असे म्हणता येणार नाही.
- सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काल राहिलेला नाही.
- प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे
--------------------------------------
परमार्थाच्या आड काय येते?
- धन/सुत (मुले)/दारा (नवरा/बायको) यांच्यावरचे ममत्व आड येते.
- विषय बाधक नाहीत, विषयासक्ती बाधक आहे
- जर आपण भगवंताकडे विषय मागितले तर आपल्याला भगवंतापेक्षा तो विषयच प्रिय आहे असे सिध्द होते.
-----------------------------------
विषयासक्ती राहू नये म्हणून साधकाने काय करावे?
- आहे ते परमात्म्याने दिले आहे, आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहावे याला वैराग्य म्हणतात.
वैराग्य/वैरागी
- जो इंद्रियांच्या नादी लागत नाही ति वैरागी.
- हा सर्व विस्तार माझा नाही या बुध्दीने राहणे याचे नाव वैराग्य
- सर्व काही रामाचे आहे असे समजणे
- संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागणे (तो टाकता येत नाही, फक्त त्यात आसक्ती न ठेवणे)
- कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणे हे वैराग्याचं लक्षण आहे.
- आसक्ती व ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणे ही तपश्चर्या आहे.
- देहसुखाची अनासक्ती किंवा हवेनकोपण टाकणे म्हणजे वैराग्य.
- अमुक हवे अथवा नको असं म्हणण्यापेक्षा आपण रामाचेच होऊन राहावे.
- आपण नाम श्रध्देने घ्यावे आणि निर्विषय होण्याकरीता घ्यावे (नाम विषयासाठी (कोणत्याही नाशिवंत गोष्टीसाठी) घेऊ नये)
- भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये
- भगवंताच्या नामापेक्षा इतर कोणत्याही गोष्टी ऐकायच्या नाहीत
- जे मिळेल त्यात त्यात समाधान मानायला शिकावे
फल -
"मी भगवंताचा आहे" असे म्हटल्यावर सर्व जगत् भगवत्स्वरूप दिसू लागते हा अनुभव नामस्मरणाने येतो.
॥श्रीराम समर्थ॥