२ डिसेंबर
--------------
अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासना
------------------
सर्वसामान्य माणूस
- त्याला मनापासून देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत नाही
- त्याला त्याचे नातेवाईक, कुटुंबीय, सगेसोयरे जास्त जवळचे वाटतात.
- तो नामस्मरण करताना सुध्दा संसाराचा विचार / चिंता करीत असतो.
-----------------------
साधकानं काय करावं?
- देवाची प्राप्ती जर झाली नाही तर लोकांना किंवा देवाला दोष देण्यापेक्षा आपले कुठे चुकते ते पाहावे
- आपणच आपल्या आड येत असतो.
- आपण ज्यांना आपले म्हणतो ते एका मर्यादेपर्यंत आपले असतात.
- पण जर देवाला आपलं म्हणलं तर तो सदासर्वकाळ आपलाच असतो.
आणि तो आपल्याला मदत करायला तयार असतो.
- आपण परमात्म्याला आपले म्हणावे
- "मी त्याचा आहे", ही सदासर्वकाळ भावना ठेवावी.
- जे जे घडत असते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असते ही भावना ठेवावी.
- अशी भावना ठेवण्यासाठी आपण त्याची उपासना करावी
- उपासना म्हणजे आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत असे वाटणे
- हे वाटण्याकरीता त्याच्या नामस्मरणात राहावे
- आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो की तो सदासर्वकाळ आपल्याजवळ राहतो.
- नामस्मरण केले की देवाला तुमच्याजवळ येणेच भाग पडते.
- मीपणारहित जो नामस्मरण करतो त्यालाच देव सांभाळतो, आणि जो स्वस्थ राहतो त्याचा योगक्षेम देव चालवतो.
॥श्रीराम समर्थ॥