१६ डिसेंबर

१६ डिसेंबर
--------------------
नाम हेच परमेश्वराची भेट करवून देईल.
-----------------
प्रपंच
- माणसांना आपले म्हणल्याने त्यांच्याबद्दल प्रेम वाटते.
- त्या आपलेपणात माणूस मरेपर्यंत गुंतलेला राहातो.
- संसार कितीही केला तरी तो पुरा झालाय असे माणसाला वाटत नाही
- मनुष्याच्या जिवाची तळमळ कशानेही शमत नाही.
- कितीही मिळाले तरी माणसाचे पूर्ण समाधान होत नाही.
----------------
भगवंतप्राप्तीसाठी साधकाने काय करावे / लक्षात घ्यावे?
- कोणतेही काम करताना नाम घेतले की त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो.
- नामाच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवा व कोणाच्या सांगण्याने बुध्दीभेद होऊ देऊ नका.
- रामाचे प्रेम त्याच्या नामाच्या संगतीनेच येईल.
- माणसाला खरे समाधान परमेश्वरभेटीनेच मिळते. त्याचे नामच साधकाला मृत्यूसमयी परमेश्वराची भेट घडवून आणेल याची खात्री बाळगावी.
- नामतले प्रेम हेच गुह्यातले गुह्य आहे.

॥श्रीराम समर्थ॥