नामीं ठेवावे चित्त । तेंच मानावें सत्य ॥
---------------------------------------------
प्रारब्ध -
- प्रारब्धानुसार देहाची गति व स्थिती असते.
- आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळते
- देहाची गति पालटणे कोणालाही शक्य नाही.
- प्रारब्धातून कोणी (साधुसंत-देवादिक सुध्दा) सुटत नाही
- सुख-दुःख प्रारब्धयोगाने येते.
- जीवनातील आघात प्रारब्धाच्या अधीन असतात.
--------------------------
साधकाने काय करावे?
- सुख-दुःख दोन्हींमध्ये गुंतू नये
- नामाची आवड ठेवावी
- चित्त भगवंतापायी ठेंवावे
- रघुनाथाला स्मरताना देहभोगाचे कष्ट होत नाहीत
- प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे
- त्याचे फल भगवंतावर सोपवावे
- आपले समाधान त्यावर अवलंबून ठेऊ नये
- मुखात एक नाम असावे
- तेच सत्य मानून मनाचा निश्चय करावा
- कर्तव्याला तत्पर असावे
- नामाचे प्रेम जतन करावे. तेच आपल्याला तारते.
- वासनेचा आधार सोडून नामाचा धरावा
- पुण्याच्या गाठी असतील तरच कंठात नाम येते.
- ज्याला रामनाम सहन होत नाही, त्याची गती कठीण असते.
- नाम निर्हेतुक घ्यावे
- नामावर बुध्दी स्थिर करावी
- नामात कसलेही विचार आले तरी ते नामानेच दूर सारावे
- अखंड समाधान राखावे
- जगनियंत्या प्रभूला आपलासा करावा
- अखंड अनुसंधान असावे.
॥श्रीराम समर्थ॥