परमपद परमपद - मी- एक साधनी: जो माझ्या ठिकाणी चित्त ठेवतो, त्याच्यावर माझी कृपा होते. तो संकटातून पार होतो व शाश्वत अव्यय परमपदाची प्राप्ती करुन घेतो. जे अनन्य भावाने माझे चिंतन करीत मला भजतात त्यांना मी योगक्षेम प्राप्त करून देतो. (माझ्यापर्यंत येऊन पोचण्यासाठी ते करीत असलेल्या साधनाचे रक्षण करतो.) शुद्ध अंत:करणाच्या भक्ताने प्रेमपूर्वक, निष्काम भावाने पान, फूल, फळ, पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारतो. (सगुणरूपाने प्रेमपूर्वक ग्रहण करतो.). सर्व भूतांकडे मी समदृष्टीने पाहातो. मला कोणी प्रिय नाही व अप्रिय नाही. परंतु जे मला प्रेमाने भजतात, जे माझ्यात (रममाण) असतात, त्यांच्यामध्ये मी सुद्धा असतो. एखादा अतिशय दुराचारीसुद्धा मला अनन्य भावाने भजत असेल तर, तो साधू समजावा. कारण त्याने माझ्या भजनासमान दुसरे काही करणार नाही, असा निश्चय केलेला असतो. असा भक्त लवकरच धर्मात्मा होतो आणि सतत टिकणारी परम शांती प्राप्त करून घेतो. माझा भक्त नष्ट होत नाही. स्त्रिया, वैश्य, शूद्र, पापयोनीत जन्माला जरी आलेले असतील तरी ते जर मला शरण आले तर ते परमगती प्राप्त करून घेतात. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |