२ फेब्रूवारी

नामाने सद्बुध्दी उत्पन्न होते.
--------------------------------
सध्याचा काल -
- मांजर उंदराशी खेळते त्याप्रमाणे काल आपल्याशी करतो आहे.
- तो आपल्याला आशेत गुंतवील आणि पुढे जाईल.
- साधकाने कोणत्याही आशेत न गुंतता अनुसंधान ठेवावे.
--------------------------------
नामावताराचे महत्व -
सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुध्दी पालटण्याचे काम होऊ शकणार नाही.
सध्या नामावताराची जरूरी आहे.
नाम म्हणजेच भगवंत आहे.
ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या.
-----------------------------
साधकाने काय करावे?
- उपासना, अनुसंधान हे प्राणाला आपण जेवढे महत्व देतो तितक्या महत्वाचे समजावे.
- बाकी व्याप हा शरीराच्या इतर इंद्रियांना आपण जेवढे महत्व देतो तितक्या महत्वाचे समजावा.
- अनुसंधान सांभाळून जेवढ्या करता येईल तेवढ्याच इतर गोष्टी कराव्यात.
- अनुसंधान नाही सांभाळले गेले तर अंती निराशा पदरी येईल.

॥श्रीराम समर्थ॥