२० फेब्रूवारी

कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण
------------------------------------
देहाचे कर्तव्य -
- आपल्या कर्तव्याला विसरु नये.
- व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे.
- उद्योगाशिवाय राहू नये.
- कर्तव्यात मनाची शांति असते.
- सर्व कर्मात भगवंताचे अधिष्ठान असावे.
- देहाने खुशाल संसारात रहावे.
----------------------------------
मनाचे कर्तव्य -
- भगवंताचे अनुसंधान राखावे.
- कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण करावे.
- राम दूर न होईल असे पाहावे.
- हृदयी रघुवीर धरावा.
- रामावर विश्वास ठेवावा.
- भगवंताचे ध्यान असावे.
- स्वतःचे कर्तेपण सोडून रामार्पण व्हावे.
- प्रपंचाची आस सोडावी.
- भलेबुरे जे असेल ते रामापायी सोडावे.
- सुखाने आयुष्य रामाच्या सन्निध्यात घालवावे.
- माझे सर्व ते रामाचे असे मानून जगात वागावे.
- राम जे करील ते योग्यच असे मानावे.
- हरीची कास सोडू नये.
- रामाचे दास होऊन जावे.
- त्याच्यावाचून दुसर्‍या कोणाची आठवण येऊ नये.
- मनाने रामाला शरण जावे.
- राम माझा माता, पिता, बंधु, सोयरा, सखा व सर्वस्व असे मानावे.
-------------------
रामाची कृपा
- राम भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो.
- भक्ताला राम जास्त कष्ट देत नाही.
- राम भक्ताला कधी कमी पडू देत नाही.
- राम त्याचे कल्याण करतो.

॥श्रीराम समर्थ॥