११ सप्टेंबर

११ सप्टेंबर-
चिकित्सा मर्यादेपर्य़ंतच करावी.
--------------------------------------
भगवंत आपलासा करुन घ्यायचा प्रयत्न करावा.
सदगुरु ने सांगीतलेले साधन अभिमानरहित होऊन केले तरच सदगुरु कृपा होते.
जे काही होणार ते सदगुरुच्याच इच्छेने, प्रेरणेने होते अशी साधकाची ठाम श्रद्धा पाहिजे.
साधनाचे प्रेम भगवंतच देतो हे साधकाच्या लक्षातच येत नाही.
प्रपंचात मनुष्याला धीर हवा.
साधकाने भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे.
आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर "आपण केले" असे थोडेच असते. ; म्हणून परिस्थितीबद्दलची जास्त काळजी न करता साधकाने आपले कर्तव्य तेवढे करावे.
चांगल्या वाईट परिस्थितीचा आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये.
श्रद्धेने व प्रेमाने साधन केले तर कोणत्याही काळात कोठल्याही परिस्थितीत साधकाला आनंदरुप होता येईल.

॥श्रीराम समर्थ॥