कुलधर्म न केल्यास

कुलधर्म केला नाही तर काय घडते याविषयी श्रीमत्‌भगवत्‌गीतेतील पहिल्या अध्यायात अर्जुनाने सविस्तर वर्णन केलेले आहे.

- अधर्म माजतो.
- वर्णसंकर होतो. (भिन्न व्यवसायामध्ये लग्न होतात.)
- श्राध्दपक्ष होत नाहीत.

त्यामुळे पितरांना तिलोदक मिळत नाही. परिणामी ते प्रेतयोनीमध्ये जातात. तिथे त्यांना असह्य त्रास सहन करावा लागतो. त्यांना मनुष्यजन्म न मिळाल्यामुळे मोक्षाची संधी प्राप्त होत नाही. त्यांचे शाप त्यांच्या वंशजांना लागतात. त्यामुळे अजून अधर्म घडत जातो.
- आईवडिल, घरातील वृध्द यांचा अपमान होतो, त्यांची अवहेलना, कुचंबणा होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, त्यांचे शाप लागतात.
- कुलदेवतांची, नवग्रहांची, अष्टदिक्पालांची, क्षेत्रदेवतांची, ब्रह्मादीमंडलाची पूजा होणे, त्यांना तूपाची आहूति मिळणे त्यातून त्यांची तृप्ती होणे हे मनुष्यजन्माचे कर्तव्य आहे. ते कुळाचाराद्वारा घडत असते. जर कुलाचार केले नाहीत तर देवतांना त्यांचा हविर्भाग मिळत नाही. या अपदेवता असल्याने त्या नाराज होतात व त्यांचे शाप घराण्याला लागतात.
- दीनदुःखी, असहाय्य, पीडीत, वारकरी, साधू-संन्यासी-अतिथी, तडी-तापसी, वैदिक पाठशाळेत शिकणारे बटू, पशुपक्षी विशेषतः गाई यांची सेवा गृहस्थधर्मात करावी असा दंडक आहे. हा धर्म कुलाचार करताना आपोआप होतो. अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा, जलपान, आसरा इ. कर्म घडतात. जर कुलाचार केले नाहीत तर समाजातील या घटकांना आसराच राहणार नाही. परिणामी गोहत्या, अतिथीचा अपमान, अवहेलना होते. कर्तव्य न केल्याचे व अधर्म केल्याचे पाप लागते ज्याला कठोर प्रायश्चित्त आहे.

अशा शापित घराण्यामध्ये कोणते अनाचार घडतात?
- भ्रूणहत्या
- अपमृत्यू (अकाली मृत्यू)
- दुर्मरण (भाजून, अपघाताने, आत्महत्येने, बुडून, खितपत पडून, खून झाल्याने)
- घरात भांडणे होणे,
- सुवासिनीला पीडा होणे (डोळ्यात पाणी येणे, अन्न गोड न लागणे, खिन्नता येणे, भीती वाटणे, स्वप्नात साप दिसणे, स्वप्नात अघटित घडताना दिसणे, सतत अस्वस्थता असणे), सवतीचा त्रास होणे (यजमानाचे संसारातले लक्ष उडणे)
- घरातून व्यक्ती पळून जाणे (तरणीताठी मुलगी/मुलगा, म्हातारी व्यक्ती, प्रमुख व्यक्ती)
- धंद्यात नुकसान होणे. कर्ज होणे, वसुलीसाठी माणसे घरी येणे. कोर्ट कचेर्‍या मागे लागणे
- नोकरी जाणे, प्रमोशन न मिळणे, कामात लक्ष न लागणे, कामाच्या ठिकाणी त्रास होणे,
- सततची आजारपणे घरात असणे,
- लहान मुलांना त्रास होणे (झोपेत ओरडत उठणे, अभ्यासात लक्ष न लागणे)
- वाममार्गाला लागणे (परदारा-परधन-परनिंदा)
- घरात सतत अशांति असणे.
- लग्ने मोडणे, घटस्फोट होणे

॥श्रीराम समर्थ॥