तमोगुणाचे आधिक्य

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना प्रथम तमोगुण मिर्माण केला.
हा सर्वात जड आहे. हा प्रत्येक निर्मितीच्या तळामध्ये विद्यमान असतो.
मनाच्याही तळामध्ये हा असतो.
याचे आधिक्य नरकवासी, पाताळवासी, मानवांमध्ये सर्व प्रकारची वामकृत्ये करणार्‍यांमध्ये असते.
----------------------------------------------------
तमोगुणाचे वैशिष्ठ्य -

- आळस, कंटाळा, बेशिस्त, पसारा, दिरंगाई, कंजुषी,
- सुखासीनता, तात्पुरते लगेच प्रयत्नाविना सुख मिळवण्याकडे कल असणे
- फसवणुकीच्या मार्गाने सत्ता, पैसा, भोग मिळवणे
- शास्त्र, संत, धर्म, नीती, भगवंत यांच्याबद्दल उपहासाची भावना असणे
- परमेश्वराविषयी संशय, त्याच्या अस्तित्वाबद्दल, विभूतींबद्दल, त्याच्या शक्तींबद्दल शंका असणे
- भक्तांविषयी वैषम्य, वैर, द्वेष, सूडभावना, हिंसा, निंदा, दयाहीनता असणे
- हीन त्याज्य साधने वापरून, निषिध्द पध्दतीने, दुसर्‍याचे वाईट होण्यासाठी अघोरी प्रयत्नांचा अवलंब करणे
- मी, मला, माझे - याचा अपरिमित हव्यास असणे
- मनामध्ये घोर अंधार - अज्ञान असणे
- इतरांचा बुध्दिभेद करून वाममार्गाला लावणे
- कोणी सज्जन काही सांगू लागला तर त्याची खिल्ली उडवणे, त्याचा अपमान करणे, त्याचा छळ करणे.

॥श्रीराम समर्थ॥