१२ सप्टेंबर

१२ सप्टेंबर

नाम अभिमानाचा नाश करतो.

"लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाशाण", असे नसावे.

जे आपण दुसर्‍यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे.नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी कर्तेपण नसावे.

खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लगते. अभिमान गालवायला भगवंताला मनापसून शरण जावे.

देवाच्या हातात मी बाहुली प्रमाणे आहे असे मानावे.

रामाशी एकदा अनन्य झाले कि प्रत्त्येक कर्म हे त्याचे होते.

असे आपले कर्तेपण गेले कि भगवान प्रसन्न होतो.

सतत नामस्मरण झाले की हे शकय होते.

॥श्रीराम समर्थ॥