नाम प्राणाबरोबर सांभाळावे.
-----------------------------
वासना -
- वासनेमुळे माणसाच्या आनंदाचा भंग होतो.
- वासना माणसाच्या आनंदाची चोरी करते.
- ज्या समाधानाकरीता माणसाची खटपट चालू असते, ते समाधानच वासना हिरावून नेते.
- वासनेमुळे जिव्हेचा उपयोग माणूस इतर गोष्टी बोलून वेळ वाया घालवण्यासाठी न कळत करतो.
- सुदृढ शरीराचा उपयोग वासनापूर्तीसाठी माणूस करतो.
- सध्या एकेका दिवसात कलिच्या प्रभावाने देवावरचा भाव जातो आहे. अश्रध्दा उत्पन्न होते आहे.
------------------------------------------
साधकाने काय करावे?
- जिव्हा ही देवाच्या प्राप्तीचे साधन म्हणजे नामस्मरण करण्यासाठी दिलेली आहे हे लक्षात ठेवावे.
- शरीरही देवाच्या प्राप्तीसाठीच दिलेले आहे हे ध्यानात घ्यावे.
- ब्रह्मानंदबुवांचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून नामाकरीता नामस्मरण करावे.
- खरे समाधान नामातच आहे. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. ते बॅंकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी तेच उपयोगी पडते.
- नामामुळे विकल्पांचे उच्चाटन होते.
- नामाचे प्रेम येण्यासाठी भगवंताला अनन्य शरण जाऊन "तुझ्या नामाचे प्रेम मला दे" अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी.
॥श्रीराम समर्थ॥