१२ जून

परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू.
------------------------------------------------------
प्रपंच -

- प्रपंचाच्या दहा दिशा आहेत.
- प्रपंचात द्वैत आहे (मी आणि पमात्मा). द्वैतात दुःख आहे.
- प्रपंचात उपाधी आहेत.
- प्रपंचाचे अवडंबर मोठे आहे.
- व्यवहारात द्वैताशिवाय नाही.
------------------------------------
परमार्थ -

- परमार्थामध्ये एकच (परमात्मा) आहे. एकामध्ये सुख व आनंद आहे.
- हे जगत्‌ पुष्कळ भासले तरी ते एकच आहे.
- परमार्थाची दिशा एकच आहे.
- मनाने काहीही न करणे हा परमार्थ आहे.
- परमार्थामध्ये जराशी सुध्दा उपाधी नाही. तिथे "मी" सुध्दा नाही.
- परमार्थ साधणे हा मनुष्याच्या जगण्याचा हेतू आहे.
------------------------------------------
साधकाने परमार्थ कसा साधावा?

- मानसपूजेत "मी" आणि "परमात्मा" अशा द्वैताने सुरुवात करावी.
- वाचनाने साधनाला जोर येतो म्हणून परमार्थ हाडीमासी खिळेपर्यंत वाचन करावे.
- मनाला भगवंताकडे गुंतवण्याकरीता काय करता येईल ते पाहावे.
- आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवीत असतात, आपण ते सांगतील तसे वागावे.
- संतांनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या मार्गाने जाताना आपले शहाणपण, आपला अभिमान मध्ये आणू नये.
- नामस्मरणात राहून विषयाची ऊर्मी उठू देऊ नये.
- विघ्नांना न घाबरता भगवंताची त्यामागची योजना लक्षात घ्यावी, विघ्ने ही सूचनावजा असतात. ती आपल्याला जागे करतात. भगवंताचे विस्मरण होऊ नये यासाठी ती असतात.
- म्हणून भगवंताच्या नामात स्वतःला विसरून जावे.

॥श्रीराम समर्थ॥