रामाला अनन्यभावे शरण जा.
----------------------------------
साधकाने रामाला अनन्यभावे शरण कसे जावे?
- "रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन" अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करावी.
- तो मदत करायला सदैव तयार असतो, आपण अभिमान बाजूला ठेवून मदतीकरता हात पुढे करावा.
- परमेश्वरापाशी आपल्या हिताचे मागावे, तो खचित देईल.
- म्हातार्या माणसांनी भगवत् भजनात आपला वेळ घालवावा.
- तरूणांनी भगवत्स्मरणात कर्तव्य करावे.
- आपले सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेमुळेच आहे हे जाणावे.
- जो काही पैसाअडका, मानमरातब मिळतो आहे, तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे जाणावे.
- जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगावी.
- कोणत्याही बर्यावाईट कर्माचा अभिमान धरू नये व खेदही करू नये.
- गर्व झाला तर रामाची आठवण करावी.
- नफा झाला तरी व तोटा झाला तरी राम आठवावा.
- आपले कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही.
- प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचे स्मरण करावे.
- "राम कर्ता" म्हणले तर सुख मिळेल.
- लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे.
- रामालाच सर्व समर्पण करून समाधान मानावे.
- रामाला शरण जावे आणि मजेत असावे; आनंदाने संसार करावा.
- "तुझ्या नामस्मरणाची गोडी दे" हेच रामाला मागावे.
- भगवंताच्या प्रेमात नेहेमी निमग्न असावे, गोपींप्रमाणे भगवंताच्या प्रेमात रंगून जावे.
- भगवंताचे प्रेम त्याच्या नामानेच साधेल, म्हणून नेहेमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवावे.
(भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद - महाराज)
॥श्रीराम समर्थ॥