अनुसंधान

भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे?
--------------------------------------
सर्वसामान्य माणसाला कशाचे अनुसंधान असते?

- देहाचे (स्वतःच्या नावाचे)
- अत्यंत आवडणार्‍या गोष्टीचे
- कामाच्या व्यापाचे.
----------------------------------
अनुसंधान म्हणजे काय?

- एखाद्या गोष्टीवर आत्यंतिक प्रेम असणं.
- आपल्याला त्याचे अनुसंधान आहे याचीही जाणीव नसणं.
- त्या प्रेमाच्या वस्तूशी एकजीव होऊन जाणं.
----------------------------------------
साधकाने भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे?

भगवंताचे अनुसंधान राखावे.
------------------------------
म्हातारपणी होणारे त्रास -

- शरीर जीर्ण झाल्याने त्याला काही ना काही होतच राहते.
- मनाला टोचणी लागते, त्याचा मनावर परिणाम होतो.
----------------------------
साधकाने आपल्या म्हातारपणाचा फायदा परमार्थासाठी कसा करावा?

- दुखण्यातून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकावे.
- वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन्‌ मावळते - अशा प्रकारे वृत्ती आवरावी.
- नेहेमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे, त्याच्या पायावर डोके ठेवावे.

सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे.
------------------------------------------------------------
संत कसे असतात?
- संत विषयाची आसक्ती कमी करतात.
- साधकाचे चित्त निर्विषय करण्याचे काम संत करतात.
- ते साधकाच्या मनात ईश्वरदर्शनाची तळमळ उत्पन्न करतात.
- त्यांची भाषा तळमळीची असते.
- जग संतांशिवाय असूच शकत नाही. ते देहात असूनही देहातीत असतात.
- नामाच्या योगाने संत ओळखता येतात, जोडता येतात, आणि टिकवता येतात.
- जो भगवंताचे नाम घेईल, त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही.

संत "तू भगवंताचा आहेस" ही जाणीव देतात.
------------------------------------------------
नाम कसे घ्यावे?

- आपण नाम कशाकरीता घेतोय त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याला अनुसंधान म्हणतात.
- "मी विषयाचा नाही, मी भगवंताचा आहे" ही जाणीव संतांकडून आपल्याला मिळते. त्याकरीता ते नाम घ्यायला सांगतात.
- ही जाणीव टिकवण्याकरीता, मनाला तेचतेच पुन्हा सांगावे लागते, म्हणून नाम सतत घ्यायचे असते.
- भाव ठेवून नामसाधन करावे, म्हणजे भगवंताची प्राप्ती लवकर होते.

प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा.
------------------------------------------
प्रपंचाचे खरे स्वरूप -
- प्रत्येक प्रापंचिक सुखासाठी धडपडत असतो.
- त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात.
- त्याची एक इच्छा पुरी झाली की दुसरी तयारच असते.
- त्याची हाव कधीच पुरी होत नाही.
- प्रपंचच खोटा असतो, तिथे त्याची हाव कशी पुरी होणार?
-------------------------------------------------
संतांजवळ काय असते?
- संतांजवळ असे काही असते ते प्रापंचिकाला व्यावहारिक जगात कुठेही मिळणारे नसते.
- ते म्हणजे भगवंताचे प्रेम.

अनुसंधान

- सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "महाराज" सोडून मला दुसरा ध्यासच नसतो.
- प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची सवय लागलीय
- काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच महाराज करीत आहेत असं वाटतं. माझ्यातलं दोषदर्शन होतं - मीपणा, लौकिकाची सूक्ष्म आस लक्षात येते.
- देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम ऐकणं चालू राहतं, मनात मी म्हणतेय की नाही याच्याकडे मी लक्ष देत असते.

अनुसंधान

(संदर्भ -श्रीगोंदवलेकरमहाराज चरित्र - लेखक - श्री. के.वि.बेलसरे)
साधकाने अनुसंधान कसे साधावे
- आपले मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून ठेवावे

Syndicate content